आमच्याबद्दल

सस्नेह नमस्कार,

      आपल्या संस्थेने ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञानाने जोडले आहे, बँकिंग क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा विस्तार झालेला आहे, या तंत्रज्ञानाचे आधारे ग्राहकांना सेवा देण्याचा आपला मानस आहे, त्या दृष्टीने संस्थेची वाटचाल सुरू आहे.

      संस्थेने या वाटचालीत नवनवीन उपक्रम राबविली आहेत, ध्येय धोरणे निश्चित केली आहेत, ती पूर्ण करण्याचा सचोटीने प्रयत्नही केला आहे, यामुळे संस्थेने सभासदांच्या व ग्राहकांच्या मनामध्ये एक वेगळा ठसा उमटविला आहे, ग्राहकांना तत्पर व बिनचूक सेवा देणे, त्यास आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे , तंत्रज्ञान शिकविणे, ग्राहकांना आकर्षित करणे , व्यवसाय वाढविणे, पर्यायाने नफा क्षमता वाढविणे, उत्कृष्ट व्यवस्थापन ई.मुळे संस्थेचा नाव लौकिक वाढला आहे.

      संस्थेचे कुटुंब प्रमुख मा. मिणीयार साहेब, संचालक मंडळ व सेवक वर्ग यांनी आपल्या बुद्धी कौशल्यातून सभासदांच्या हितासाठी अनेक योजना साकारल्या आहेत, त्यासाठी अविरत परिश्रम घेतले आहेत, सभासदांचा विश्वास संपादित केला आहे, आणि म्हणूनच संस्थेची जनमानसात उत्तुंग प्रतिमा निर्माण झाली आहे, सभासदांनी व ग्राहकांनी संस्थेस अनमोल सहकार्य व मार्गदर्शनामुळे संस्थेची घोडदौड सुरू आहे.

उल्लेखनीय कामगिरी

भागभांडवल व सभासद :

अहवाल वर्षात संस्थेचे भागभांडवल गतवर्षापेक्षा रू. 1.34 कोटी ने वाढून रू. 19.04 कोटी इतके झाले. सभासद संख्येमध्ये 5562 सभासदांची वाढ होऊन, राजीनामे वजा जाता सभासद संख्या 27644 इतकी झाली. या नियमित सभासदांव्यतिरिक्त अहवाल सालातील नाममात्र सभासदांची संख्या 3264 इतकी आहे.

स्वनिधी :-

भागभांडवल, राखीव निधी व इमारत निधी मिळून असलेल्या स्वनिधीची रक्कम 49.17 कोटी इतकी झाली आहे.स्वनिधी संस्थेच्या आर्थिक क्षमतेचा मापदंड असुन यातील एकसमान व सुसंबध्द वाढ संस्थेची दमदार आणि सुदृढ आर्थिक स्थिती दर्शविते.

ठेवी:

अहवाल वर्षामध्ये संस्थेच्या ठेवी रू. 39.08 कोटीने वाढून रू. 421 कोटी 05 लाख इतक्या झाल्या आहेत.

कर्जेः

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये बँकिंग क्षेत्रात कर्जातील वाढ ही खूपच मंदावलेली होती. या मंदावलेल्या कर्ज वृद्धीच्या पार्श्वभूमीवर संस्थेची या क्षेत्रातील कामगिरी समाधानकारक आहे. अहवाल वर्षामध्ये संस्थेची एकूण कर्जे रू. 282 कोटी 81 लाख इतकी झाली आहेत.

सांपत्तिक स्थिती

अ. न. तपशील 2022-23 2023-24
1 सभासद संख्या (Number of Members) 27644 31785
2 वसूल भागभांडवल (Paid up Share Capital) 190455475 202782450
3 राखीव निधी (Reserve Funds) 196163363 211560852
4 इतर निधी (Other Funds) 707501963 769035275
5 ठेवी (Deposits) 4210512494 4633117769
6 कर्जे (Loans & Advances ) 2828137382 3123883677
7 गुंतवणूक ( Investments ) 2570263423 2748603633
8 थकबाकी मुदत संपलेली 284477496 348411645
9 थकबाकी शे. प्रमाण (Outstanding ) 10.05% 11.15%
10 निव्वळ NPA प्रमाणपत्र (Net NPA Certificate) 2.44% 0.00%
11 निव्वळ नफा (Net Profit ) 57745793 75407258
12 खेळते भांडवल (Working Capital ) 5564902141 6115869137
13 ऑडिट वर्ग (Audit Class ) ‘अ’ ‘अ’
14 शाखा (मुख्यालयासह) 28 28
15 लाभांश (Dividend) 10 10
16 एकूण व्यवसाय (Total Business) 146,24,74,257.69 161,66,17,092.69


ठेवी (किमती लाखांमध्ये)
मार्च 2020₹ 34608
मार्च 2021₹ 36338
मार्च 2022₹ 38197
मार्च 2023₹ 42105
मार्च 2024₹ 46331
कर्ज (किमती लाखांमध्ये)
मार्च 2020₹ 23550
मार्च 2021₹ 26610
मार्च 2022₹ 26849
मार्च 2023 ₹ 28281
मार्च 2024₹ 31238.83
गुंतवणूक (किमती लाखांमध्ये)
मार्च 2020₹ 20122
मार्च 2021₹ 20149
मार्च 2022₹ 21756
मार्च 2023₹ 25702
मार्च 2024₹ 27486